Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस उप निरीक्षक रामनगर चंद्रपूर यांच्यावर प्राणघातक हल्ला

पोलीस उप निरीक्षक रामनगर चंद्रपूर यांच्यावर प्राणघातक हल्ला

कुणाल उंदीरवाडे/विदर्भ 24 न्युज

शहर प्रतिनिधी, सिंदेवाही

मोबाईल न.8806370336

चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन मधील पो.उ.नि. लाकडे यांना चारचाकी वाहनातून दारु तस्करी करीत असल्याची खबर मिळाली. सदर बातमी कळताच पो.उ.नि. लाकडे यांनी आपल्या सहायक कर्मचाऱ्याला घेऊन शुक्रवारी रात्री १०. ३० वाजता डिस्पेन्सरी चौकात गेले. यावेळी त्या आरोपीला याची भनक लागली आणि त्याने हे वाहन आपल्या स्वतःच्या घराकडे पळविले. महाकाली चौकात त्याच्या घरी वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ४ पेट्या आढळून आल्या. तदनंतर पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी रामनगर पोलीस स्टेशन ला घेऊन जात असताना पो.उ.नि. लाकडे आणि आरोपी यांच्यात झटापट झाली, सदर वेळी आरोपीचे आई वडील आणि आरोपीचे दोन सहकारी यांनी देखील पो.उ.नि.लाकडे यांना मारहाण केली. यात लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा फरार आहे. सदर प्रकरणातील आरोपीचे नाव अमित गुप्ता असल्याचे कळले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!