सावली शहरात मागील एक महिन्यापासून नागरिक पाण्यापासून वंचित
सावली शहरात मागील एक महिन्यापासून नागरिक पाण्यापासून वंचित
सावली (ता. प्र.) : मागील एक महिन्यापासून शहरातून मे. गुरुबक्षानी कंपनी द्वारे महामार्गाचे काम सुरु आहे. सदर महामार्गात सावली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आल्याने कंपनी च्या निष्काळजी व मुजोरपणाने ती जलवाहिनी फोडली. त्यामुळे सावली शहरात मागील एक महिन्यापासून नळाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी येत नसल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहान्याची वेळ आली आहे.
सावली शहरातून मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण सुरु आहे. सदर काम अतिशय संथ गतीने सुरु असून या कामात मुख्य जलवाहिनी आल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहरात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संबंधात शहरातील महिलांनी तक्रार सुद्धा केली मात्र कंपनीच्या तुघलकी धोरणामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सदर समस्येबाबत विचारणा केली असता लॉक डाऊन व पावसाचे कारण सांगून कंपणी वेळ मारून नेत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुख्य मार्गाची एक बाजू वाहतुकीस खुली करण्यात आली असली तरी एक बाजू मात्र चिखलमय असल्याचे चित्र आहे. याच बाजूने असलेली मुख्य जलवाहिनी फुटली असून याकडे मात्र कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ सावली करावर आल्याने कंपनी च्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात असून आमची आर्त हाक कुणी ऐकेल का? असा सवाल वरिष्ठांंना केल्या जात आहे.



