Vidarbh24News

Latest Online Breaking News

लॉकडाऊन काळात गोरगरिबांना दिलासा

लॉकडाऊन काळात गोरगरिबांना दिलासा

जुलै महिन्यातील धान्याचे परिमाण जाहीर

शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल करण्याचे आवाहन

गडचिरोली जिल्ह्यातील माहे जुलै 2020 मध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारे धान्याचे परिमाण जाहीर झाले असून शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील वितरित होणाऱ्या धान्याचे परिमाण व किंमत पुढीलप्रमाणे आहे.माहे जुलै 2020 मध्ये सर्व अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांना दर महिन्याप्रमाणे 15 किलो गहु रुपये 2 प्रति किलो प्रमाणे व तांदुळ 20 किलो रुपये 3 प्रति किलो प्रमाणे तसेच साखर प्रति शिधापत्रिका 1 किलो रुपये 20 प्रति किलो मिळेल.

प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहु रुपये 2 प्रति किलो प्रमाणे व तांदुळ 2 किलो प्रति व्यक्ती रुपये 3 प्रति किलो प्रमाणे मिळेल. यासोबत केंद्र शासनाचे प्राप्त निर्देशानुसार उपरोक्त दोन्ही योजनेच्या कार्डधारक लाभार्थ्यांना माहे जुलै 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत दर महिन्यात प्रति व्यक्ती 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.

उर्वरित एपीएल केशरी कार्डधारकांना माहे जुलै व ऑगस्ट 2020 या दोन महिन्यासाठी गहु रुपये 8 प्रति किलो व तांदुळ रुपये 12 प्रति किलो या दराने प्रतिमाह प्रति व्यक्ती 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र कार्डधारकांनी नेमुन दिलेल्या स्वस्त धान्य दुकानात जावुन रेशनकार्डवर देय असलेल्या संपुर्ण धान्याची उचल करावी. धान्य घेतेवेळी पॉस मशीनमधुन निघणारे बील घेवुन त्या बिलाप्रमाणेच पैसे द्यावे. दुकानात एकाचवेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. सर्वांनी मास्कचा वापर करावा. दुकानदारांनी कार्डधारकांना हात धुण्यासाठी पाणी व साबणाची व्यवस्था करावी. दुकानदार किंवा मिळणाऱ्या धान्याबाबत काही तक्रार असल्यास कार्डधारकांना 1800-22-4950 किंवा 1967 या दुरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!