Vidarbh24News

Latest Online Breaking News

23 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

23 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी
ऑनलाइन नाव नोंदणी करण्याचे आवाहन

गोंडपिपरी, दि.17 जुलै: जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाच्या वतीने दिनांक 23 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलवर स्वतःची नावनोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नावनोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हाट्सअप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग इत्यादींच्या माध्यमातून दिनांक 23 जुलै 2020 रोजी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!