1 जुलै पासून एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) प्रशिक्षण केंद्र सुरु
1 जुलै पासून एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) प्रशिक्षण केंद्र सुरु
एम.के.सि.एल च्या एम.डी विना कामात यांच्या प्रयत्नांना यश
कोरोनाच्या महामारीमुळे मागील तीन महिन्यापासून राज्यातील एम.एस.सी.आय.टी संगणक प्रशिक्षण केंद्र पूर्णपणे बंद होते. ऐन सिजनमध्ये प्रशिक्षण केंद्र बंद असल्यामुळे संस्थाचालकांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. राज्यातील सर्वच व्यवसाय आता हळू हळू सुरु होत असतांना एम.एस.सी.आय.टी संगणक प्रशिक्षण संस्थांना सुद्धा आपले संस्थान सुरु कार्याची राज्यसरकारला विनंती करण्यात आली. एम.के.सी.एल चे एम.डी विना कामात यांनी राज्यसरकारला पत्राद्वारे विनंती करून सर्व एम.एस.सी.आय.टी संगणक प्रशिक्षण सुरु करण्या संबंधी अर्ज केले.
राज्यसरकार सुद्धा पुढल्या महिन्यापासून टप्याटप्याने शालेय शिक्षण सुरु करण्याच्या मानसिकतेत होते. अशात संगणक शिक्षण सुद्धा महत्वाचे असल्याने आता एम.एस.सी.आय.टी कोर्स त्याचबरोबर क्लिक कोर्सच्या प्रशिक्षणाला सुद्धा १ जुलै पासून नियम व अटीचे पालन करून प्रशिक्षण सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे एम.एस.सी.आय.टी संस्थाचालकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.



