Vidarbh24News

Latest Online Breaking News

पालेबारसा येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा

सावली : तालुक्यातील पालेबारसा येथील पुरातन स्वयंभू महादेव मंदिरात दिनांक १४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दोन दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी विधीवत घाटस्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याने उत्सवाची सांगता करण्यात आली. या दोन दिवसांत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. गावकऱ्यांनी व परिसरातील भक्तांनी महादेवाची पूजा-अर्चा करून दर्शन घेतले. मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोपाळ काला कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री. लोखंडे सर, ज्येष्ठ नागरिक श्री. खेडेकर गुरुजी तसेच माजी संचालक तथा विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. खुशाल लोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपाळ काला व महाप्रसाद वितरण सोहळा पार पडला.

या महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन श्री. रमेश पाटील तिवाडे, श्री. उमाकांत धुळसे, प्रवीण पाटील बुटोलिया, विठ्ठल सिडाम, डॉ. पटेल, मिलिंद धुळसे, शिवचरण कुमरे, चंद्रशेखर वाळके, संदीप धुळसे, गोकुळ गेडाम, नेमाजी धुळसे, प्रशांत चिमुरकर, विलास कावळे, बंडू धुर्वे, सौ. प्रिया बुटोलिया, उर्मिला धुळसे, कोमला सिडाम, अश्विनी धुळसे, श्रीमती गुज्जनवार, सविता भांडारकर, जया वाळके, मुक्कान पटेल, मंगला धुळसे, लता कुमरे, विद्या हजारें, तिवाडे मॅडम आदींनी परिश्रमपूर्वक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!