Vidarbh24News

Latest Online Breaking News

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 50 रुग्णांची बस नागपूरकडे रवाना

सावली: कलार समाज ता. सावलीचे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांच्या पुढाकाराने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची पहिली बस दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी जिबगाव येथून नागपूरकडे रवाना करण्यात आली. या बसमधून 50 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.

गरीब, गरजू व वयोवृद्ध रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी व त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश यावा या उदात्त हेतूने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर येथे सर्व रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार असून अनेकांचे धूसर झालेले आयुष्य पुन्हा उजळणार आहे.

बस रवाना करण्यापूर्वी कु. श्रद्धा डांगे या चिमुकलीच्या हस्ते बसची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी राकेश गोलेपल्लीवार, प्रशांत डांगे, नरेश गडपलीवार, उमेश गोलेपल्लीवार, आशिष गडपल्लीवार, राजू बावणे, सुरेश भोयर, शामराव आलाम आदी उपस्थित होते.

कलार समाजाच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!