Vidarbh24News

Latest Online Breaking News

पत्रकार आदित्य भाके यांना जिवे मारण्याची धमकी

पत्रकार आदित्य भाके यांना जिवे मारण्याची धमकी

महेश काहीलकर/विदर्भ 24 न्युज

शहर प्रतिनिधी, चंद्रपूर

नगराध्यक्ष अरुण धोटे आणि अशोक राव यांचेवर अदाखल पात्र गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी

बातमी टाकल्याच्या कारणावरून दिली धमकी

अशोक राव यांचेवर ६ दिवसापूर्वीच गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल अद्याप अटक नाही

राजुरा तालुक्यातील माथरा येथील दोन शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या वाद सुरू आहे.या वादातून अशोक राव या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने काही गुंड प्रवृत्तीच्या २० ते २५ लोकांना शस्त्र घेऊन जाऊन एका शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार राजुरा पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.आणि या तक्रारीवरून अशोक राव याचे वर भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम१४३,१४९,४२७,५०४,५०६ शसूत्र अधिनियम १९५९ नुसार कलम २५,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु आरोपीला ६ दिवस लोटून अटक करण्यात आली नाही व आरोपीचा पोलिस परिसरात वावर सुरू आहे.अशी बातमी कोणाचेही नाव न टाकता महा घडामोडी न्यूज ने प्रसारित केली होती.त्यानंतर लगेच राजुरा चे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी महा घडामोडी न्यूज चे कार्यकारी संपादक आदित्य भाके यांना फोन करून चर्चा करण्याकरिता घरी बोलविले अशी ऑडियो क्लिप महा घडामोडी न्यूज च्या हाती लागली आहे.
आदित्य भाके हे अरुण धोटे यांच्या घरी गेले असता गुंड प्रवृत्तीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला अशोक राव सुद्धा अरुण धोटे यांच्या घरी हजर होता आणि यांनी दोघांनी मिळून आदित्य भाके यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत हात पाय तोडून जिवे मारण्याची धमकी देत पत्रकार लोग हामारा कुछ नहीं बिघाड सकते अश्या प्रकारची धमकी दिली.नगराध्यक्ष अरुण धोटे आणि अशोक राव यांचे वर अनेक गुन्हे दाखल असून अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आदित्य भाके यांच्या जीवितास धोका असल्याचे आदित्य भाके यांनी दिलेल्या तक्रारित म्हंटले आहे.आणि हे कृत्य अशोक राव या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक न झाल्यामुळे घडले आहे.त्यामुळे पत्रकार स्वरक्षण कायदा अंतर्गत कारवाही करण्यात यावी अशी मागणी आदित्य भाके यांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!