Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली तालुक्यातील तिन वेगवेगळ्या घटनेतील तीन आरोपींना अटक

सावली तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर (वय १९) या आरोपीने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. मात्र, लग्नास नकार दिल्याने पालकाच्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
तर, सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम या (वय २५) युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!