Vidarbh24News

Latest Online Breaking News

विदर्भ स्तरीय सारेगमप स्पर्धेत चिमूरचा अमोल देऊलवार प्रथम

यवतमाळच्या स्वरा लाड ने पटकाविले व्दितीय क्रमांक

वरोरायेथील रोटरी क्लबच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय सारेगमप प्रवास सप्तसुरांचा या गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी 15 ऑक्टोंबर २००२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात आली यात चिमूर तालुक्यातील पिपर्डा या ग्रामीण भागातील अमोल देऊलवार याने प्रथम क्रमांक पटकावला. यवतमाळच्या स्वरा लाड हीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.वरोऱ्याची अवंती अवंती घुडे तिसऱ्या क्रमांकावर राहिली. वरोरा येथील रोटरी क्लबच्या वतीने विदर्भ स्तरीय सा रे ग म प ही गीत गायन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी रविवार 9 ऑक्टोबर रोजी ऑडिशन घेण्यात आले यात ८२ स्पर्धकांनी भाग घेतला त्यातील 21 स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. ही अंतिम फेरी शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी स्थानिक आंबेडकर चौकात पार पडली या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते ऑडिशन राऊंड मधून निवड करण्यात आलेल्या 21 स्पर्धकांची आपल्या गीताचे उत्तम सादरीकरण केले यात चिमूर तालुक्यातील पिपर्डा या ग्रामीण भागातील अमोल देऊलवार याने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. द्वितीय पुरस्कार यवतमाळच्या स्वरा लाड हिने पटकावला वरोरा येथील अवंती घूडे यांनी तृतीय स्थानी राहिले. वृषभ लोणबले हिंगणघाट,मयूर पटाईत नागपूर आणि राकेश काळे वरोरा यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. बारा ते अठरा वयोगटातील युवराज लोया आणि तन्वी कवाडे या स्पर्धकांना विशेष पुरस्कार देण्यात आले.सदर परीक्षेचे परीक्षण नागपूर येथील सुरभी ढोलणे, सचिन ढोले यांनी केले.
कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना भरभरून प्रतिसाद दिला.रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग पत्तीवार सचिव अदनान सिद्धीकोट डॉ. सागर वझे नितेश उर्फ दादा जयस्वाल,योगेश डोंगरवार होजप्पा अली,,समीर बारई, आनंद बेदरकर, अभिजीत मनियार, राहुल पावडे, मनोज कोहळे,जितू मते नूतन जुनघरे, प्रफुल कांबळे यांच्यासह रोटरी क्लबच्या सर्व सभासद पदाधिकारींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. विदर्भ स्तरीय सारेगमप

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!