Vidarbh24News

Latest Online Breaking News

ग्रामीण भागातील युवकांनी सामाजिक संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पुढे यावे प्राध्यापक डॉ. वाघ

स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे नुकतेत्याच संपन्न झालेल्या सामाजिक संशोधन कार्यशाळेमध्ये प्राध्यापक डॉ. वाघ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सामाजिक संशोधन क्षेत्रात वास्तविक सत्य ज्ञान देणे अत्यंत आवश्यक असून सामाजिक क्षेत्रात प्रगती होण्यास फार मदत होईल विद्यार्थी वर्गाने आतापासून संशोधन क्षेत्रातील मार्गाने ज्ञान अवगत करून पीएचडी प्राप्त केली पाहिजेल ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आहेत त्यांचे समाजशास्त्रीय पद्धतीने अवलोकन होणे अत्यंत आवश्यक आहे देश जागतिक व देश पातळीवर प्रगतशील करावयाचे असल्यास त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक लवकर झाली पाहिजे.

नैसर्गिक व सामाजिक शास्त्रात फरक असून सामाजिक शास्त्राचे सत्य ज्ञान समाजासमोर आले पाहिजे संशोधन कशाप्रकारे करावे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या व कशाप्रकारे संशोधन कार्य पूर्ण करायचे यांची अद्यावत माहिती कार्यशाळेत देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असून त्यांनी प्रामाणिकपणे संशोधन अभ्यास केल्यास ते कधीच मागे राहणार नाही विद्यार्थी वर्गाने मनातून भीती काढून आता विश्वासाने पुढे यावे जेणेकरून आपले आपली व समाजाची व सामाजिक शास्त्राची प्रगती होईल आपल्या क्षेत्रातील प्रश्न केंद्र व राज्य सरकार लवकर सोडवते शेती व उद्योग पत्र विकसित होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. खोब्रागडे होते त्यानी सुद्धा अध्यक्षीय भाषणामध्ये संशोधन करून आपले प्रश्न सोडवावे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. दिवाकर उराडे यांनी केले संचालन कुमारी साक्षी गंडाटे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक बडवाईक प्राध्यापक वासाडे प्राध्यापक डॉ. वासेकर हे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार कुमारी साक्षी मडावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक खोब्रागडे मॅडम, प्राध्यापक बागडे, प्राध्यापक वराडे, प्राध्यापक गुरुनुले, प्राध्यापक वराडे प्राध्यापक नवले मॅडम, संजय पडोळे, ईश्वर मोहूर्ले हरिदास चचाने, कुमारी बाबनवाडे, कुमारी शुभांगी वाढवे, कुमारी शुभांगी वाढई, कुमारी संकर गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!