Vidarbh24News

Latest Online Breaking News

एंजल ब्युटी पार्लरच्या संचालिकेने घेतली वणी पोलिस स्टेशनला धाव आणि केली पतिविरुद्ध तक्रार दाखल

•पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी गेलेल्या मोठ्या बहिणीलाही हॉकी स्टिकने मारहाण

वणी (4 मे):- वणी येथील  विठ्ठलवाडी मधील एक प्रतिष्ठित कुटुंबात 1 मे रोजी शुल्लक वाद झाला व लगेच 3 मे रोजी आणखी एक वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले त्यात विशेष म्हणजे पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मोठ्या बहिणीलाही हॉकी स्टिकने मारून जखमी केल्याची तक्रार स्वतः पत्नीने रितसर वणी पोलिस स्टेशनला दाखल केली.

सविस्तर असे की,नमिता सुनील गेडाम वय (40वर्ष) रा.विठ्ठलवाडी,वणी येथे राहतात व  पती सुनील कृष्णाजी गेडाम वय (48वर्ष) यांचा दोघात किरीमिरी वाद झाला.महाराष्ट्र दिनीच त्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी 1 मे रोजी सायंकाळी वाद झाले.त्यानंतर पती सुनील गेडामने  पत्नी नमिताला व दोन मुलांना घरा बाहेरचा अहेर दाखविला. आता जायचं कुठ ? असा प्रश्न नमिताला पडल्याने तिने त्या दोन मुलांना सोबत घेऊंन वणीतीलच एका मोठ्या लॉजवर थांबली.

घरी घडलेला प्रकार नमिताने मोठ्या बहिणीला (प्रिती पाटील) सांगितले व प्रितीने तिची आपबिती ऐकली व वणी येथे पाहोचली.

पण जेव्हा ती व तिचा बहीणीला घेऊन घरी आली तेंव्हा सुनीलने त्या दिवशी कोणताच वाद केला नाही मात्र परत 3 मे ला दुपारी त्यांनी तीचाशी वाद घालने सुरू केले व त्या दोघांचा वादात मध्यस्थी म्हणून प्रिती पाटिल गेली असता हॉकी स्टिकने प्रितीलाही सुनीलने मारहाण केल्याची माहिती तक्रारीत सांगितले आहेत.

 

त्यांनी कुठेही व काहीही न बघता हा घडलेला प्रकार  नमिता गेडाम व तिचा बहिणीने वणी पोलीस स्टेशन गाठून पती सुनील गेडाम याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली व  भा.द.वि कलम 326, 323,504,506 नुसार गुन्हा वणी पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे. समोरील तपास वणी पोलिस करित आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!