Vidarbh24News

Latest Online Breaking News

गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलीस बॉईज असोसिएशनने दिले निवेदन

गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलीस बॉईज असोसिएशनने दिले निवेदन

चंद्रपूर :- दिनांक 06 / 06 / 2020 रोजी .. पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक – अध्यक्ष श्री. प्रमोद तानाजी वाघमारे सर यांच्या आदेशानुसार चंद्रपूर येथे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख सर यांना ” पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने ” महाराष्ट्र पोलीसांच्या ” विविध मागण्यांचे निवेदन विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री.भुवनेश्वर निमगडे यांच्या नेतृत्वाखाली सद्दाम अन्सारी ,देविदास बोबडे ,साहिल मडावी या शिष्टमंडळाने दिले.

या आहेत मागण्या 

1 ) जोपर्यंत कोरोना बंदोबस्त आहे ..तोपर्यंत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना दुप्पट पगार देण्यात यावा.

2 ) प्रत्येक जिल्ह्यात तेथील पोलीसांची संख्या पाहून स्वतंत्र हॉस्पिटलची व अंबुलन्सची व्यवस्था करून दर आठवड्याला पोलीसांची कोरोनाची तपासणी करावी.

3 ) पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी हे सेवानिवृत्त होऊन मरण पावले असता ..महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेअंतर्गत पोलीस कुटूंब आरोग्य योजनेचा लाभ शेवटपर्यंत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळावा.

4 ) राखीव पोलीस उपनिरीक्षक 2014 मधील सर्व उमेदवारांना पदोन्नती देऊन ..RSI – RPI – तसेच R – DYSP यांच्या जागा तात्काळ भरण्यात याव्या.
5 ) 2013 मधील विभागीय मर्यादित उपनिरीक्षक परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी.

6 ) 2016 मधील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेतील पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावे.

7 ) पोलीस पाल्यांना पोलीस भरतीमध्ये 10 % आरक्षण देण्यात यावे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!