लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद….
– संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियाना अंतर्गत .
वणी :- शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून काही नागरिकांनी सुद्धा रक्तदान केले.रक्तदान श्रेष्ठदान संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियाना अंतर्गत कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (N.S.S),राष्ट्रीय छात्र सेना विभाग (N.C.C), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र,
क्रीडा विभाग व औषधी निर्माणशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नीलिमा दवणे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रसाद खानझोडे त्यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानचे महत्व सांगितले, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल मुजगेवार यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. रेड्डी प्राचार्य औषधी निर्माणशास्त्र संस्था यांनी रक्त दान महत्वाचे आहे तसे प्रत्येकाने सामाजिक दायित्व समजून हे श्रेष्ठ व काळाची गरज म्हणून दान करावे असे मनोगत व्यक्त केले.
प्रा.डॉ. रवींद्र मत्ते, प्रा.राजेंद्र कोठारी, प्रा. उमेश व्यास यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशन घोगरे यांनी केले. मुस्कान सय्यद हिने कार्यक्रमाचे आभार मानले.




