Vidarbh24News

Latest Online Breaking News

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या #व्हर्चुअल_रॅलीला राजुरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार. ८८५५९९४००१

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या #व्हर्चुअल_रॅलीला राजुरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.

राजुरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसा निमित्य मुंबई येथून प्रसारित केल्या गेलेल्या वरचुल रॅलीचे आयोजन राजुरा येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते २ पर्यंत करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता राजुरा शहर व तालुक्यातील विविध भागात मिटिंग घेऊन रॅली चे महत्व कार्यकर्त्याना समजवून सांगण्यात आले त्याचाच परिणाम आज दिनांक १२ डिसेंबर रोजी स्वयंवर मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे तथा सर्वच पक्षाचे असंख्य स्थानिक नेते पदाधिकारी समाजसेवी व राजुरा तालुक्यातील असंख्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते व साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वर्चुअल रॅली च्या माध्यमातून पक्षातील जेष्ठ नेत्यांनी पवार साहेबां बद्दल बोलताना जुन्या अनेक आठवणींना उजाळा दिला. राजुरा शहरातील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील लोकांनी, युवक, विद्यार्थी, शेतकरी सह सर्वसामाण्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन साहेबांप्रति प्रेम व्यक्त केले. साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्याचे मनोबल उंचावले असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतांना भविष्यात उपयोगी पडेल यात शंका नाही. ह्या कार्यक्रमाचे आयोजन राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, राजुरा शहराध्यक्ष आशिष यमनुरवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष महेमुद भाई मुसा, राजुरा युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, रोहित दादा पवार विचार मंच तालुकाध्यक्ष सुजित कावळे, रोहित दादा पवार विचार मंच शहराध्यक्ष ऑस्टिन सावरकर, शहर उपाध्यक्ष रखिब शेख, उपाध्यक्ष राजू ददगाळ, सचिव विजय कुमार, संघटक सचिव संदीप पोगला, महासचिव प्रसाद देशमुख, महासचिव अंकुश भोंगळे, महासचिव नदीम शेख, सहसचिव जहीर मो. खान, शकील भैय्या, गुणवंत जी कोडपे, गौरव वासाडे, गौरव कोडापे, आलविन सावरकर, सोनू चाऊस, स्वप्नील वाढई, सोहेल शेख, महेश काळे, विदेश मांढरे,राहुल वणकर, मंगेश वाघमारे, हिरालाल मेश्राम, अक्षय पानपटे, राहुल करमरकर, अनिकेत तातेवार, संतोष करमनकर, कुणाल गंदाते, अशद बेग, जाफर खान, राहुल जैस्वाल, किरण वनकर, जुनेद शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वितेकरिता अथक परिश्रम केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
04:47