Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोना अपडेट

चंद्रपूर, दि. 5 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 150 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 79 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 686 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 532 झाली आहे. सध्या एक हजार 838 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 54 हजार 828 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 31 हजार 818 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये राणी लक्ष्मीबाईं वार्ड बल्लारपूर येथील ६४ वर्षीय पुरुष व चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ भागातील ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 316 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 293, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 79 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 29, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपुर तालुक्यातील तीन, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी एक, सिंदेवाही आठ, मुल तीन, गोंडपीपरी दोन, राजुरा सात, चिमुर सहा, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!