Vidarbh24News

Latest Online Breaking News

गत 24 तासात 169 कोरोनामुक्त 172 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू Ø आतापर्यंत 18,235 बाधित झाले बरे Ø उपचार घेत असलेले बाधित 1,910

 

चंद्रपूर, दि. 3 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 169 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 172 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 455 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 235 झाली आहे. सध्या एक हजार 910 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 53 हजार 009 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 30 हजार 281 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील 69 वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 310 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 287, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 172 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 45, चंद्रपूर तालुक्यातील 12, बल्लारपुर तालुक्यातील पाच, भद्रावती 17, ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, सिंदेवाही आठ, मुल 17, सावली तीन, गोंडपीपरी सहा, राजुरा पाच, चिमुर पाच, वरोरा 16, कोरपना 25, जिवती एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!