Vidarbh24News

Latest Online Breaking News

अंगावर रॉकेल ओतून विवाहितेने स्वत:ला जाळून घेतले.

सिंदेवाही तालुका येथील मुरपार (तु.) येथील देवराव तुकाराम कुमरे याचा मुलगा बंडू देवराव कुमरे वय ३१ वर्षे याचा विवाह जिवनापूर ता. नागभिड येथील घनशाम कुळमेथे यांची मुलगी भारती हिचेशी दोन वर्षे अगोदर पारंपरिक पद्धतीने झाला. त्यांना श्रेयसी नावाची २ वर्षाची मुलगी सुद्धा आहे. बंडूला दारूचे प्रचंड प्रमाणात व्यसन असल्याने पती- पत्नी यांच्यामद्धे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन भांडण व्हायचे. त्यातच दिनांक २६/११/२०२० ला सायंकाळी 7 : 00 वाजे दरम्यान दोघाचे भांडण झाल्याने पतीच्या वारंवार च्या त्रासाला कंटाळून, भारती हिने रागाचे भरात स्वताचे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. त्यात तिचा उजवा हात बऱ्याच प्रमाणात जळालेल्या अवस्थेत आहे. सदर घटणेची तक्रार सिंदेवाही पोलिस स्टेशनला दिली.
तक्रारीची दखल घेत सिंदेवाही पोलिसांनी अ. प.क्र.- ५३३/२०२० नुसार आरोपीवर कलम ४९८ (अ) ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अजूनतरी अटक झाली नसल्याचे पोलिस सुत्राद्वारे कळले. गुन्ह्याचा पुढील तपास ए. पी. आय. योगेश घारे-ठाणेदार सिंदेवाही यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. गोपीचंद नेरकर हे करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!