*पोंभुर्णा येथील राजराजेश्वर मंदिरात व तालुक्यतील ठिक ठिकाणी हनुमान मंदिरात मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना*
पोंभुर्णा येथील राजराजेश्वर मंदिरात व तालुक्यतील ठिक ठिकाणी हनुमान मंदिरात मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी कार्यकर्त्यानी प्रार्थना केली.
काही दिवसापुर्वीच मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना कोरोना संसर्ग झाला. त्या अनुषंगाने पोंभुर्णा भा.ज.यु. मोर्चा,पोंभुर्णा तालुक्यतील पदाधिका-यांनी हनुमान मंदिरात जाऊन आरती केली तसेच हनुमान चालीसाचा पाठ करण्यात आला.
यावेळी मा.आ.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कोरोना आजारावर मात करावी त्यांचे आरोग्य चांगले राहावे व लवकारात लवकर प्रकॄतीत सुधारना व्हावी आणि पुन्हा ते लोकांच्या सेवेत रुजु व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, नगरसेवक अजित मंगळगिरीवार, अजय मस्के युवा मोर्चा,तालुका अध्यक्ष ,मोहन चलाख युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,
अमोल मोरे युवा मोर्चा तालुका महामंत्री,
निलेश चिंचोलकर तालुका उपाध्यक्ष,
आदित्य तुमलवार तालुका महामंत्री, चकफुटाना सरपंच तुळशीराम रोहनकर,नवेगावं मोरे नेरु मोरे,अमोल पाल,परशुराम बुरांडे,
विनोद कानपल्लीवार,राजू ठाकरे तथा समस्त भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.



