Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथे नवीन शासकीय कोविड सेंटर व ट्रामा केअर सुरू करा तसेच खाजगी कोविड सेंटर उघडल्यास गरिबांना मोफत उपचार द्या”- माकपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

● वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून इथे एकच कोविड सेंटर असल्याने रुग्णांना यवतमाळ, चंद्रपूर किंवा नागपूरला हलवावे लागते आहे, परिणामी अनेक रुग्णांच्या ह्या तालुक्यात मृत्यू होतो आहे, ह्याकरीता ताबडतोब वणी येथे पुन्हा एक नवीन कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दि. १८ सप्टेंबर ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे

 

 

वणी तालुका औद्योगिक क्षेत्र असल्याने इथे परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर येतजात असल्याने कोरोना संक्रमण मोठया प्रमाणावर होताना दिसते आहे, ह्यातच काही जणांच्या मृत्यू सुद्धा झालेला आहे. परसोडा येथे असलेल्या एकच कोविड सेंटर मुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. परसोडा येथे कोविड सेंटरमध्ये आरोग्यदायी स्वच्छतेच्या अभाव असल्याने अनेक तक्रारी समोर येत आहे. ह्या सेंटरमध्ये डॉक्टर व नर्सेस ची कमतरता असल्याने ही असुविधेत वाढ होत आहे, ह्याकरता परसोडा येथे डॉक्टर व नर्सेस ची संख्या वाढवून तेथे आरोग्यदायी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, त्याचधर्तीवर वणी परिसरात पुन्हा एक दुसरे शासकीय कोविड सेंटर ची उभारणी करावी तसेच वणी ग्रामीण रुग्णालय शेजारी उभारलेल्या ट्रामा केअर सेंटर मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून डॉक्टर व नर्सेस ची भरती करून ताबडतोब सुरू करावे, वणी येथे शासकीय कोविड सेंटरची दुरव्यवस्था पाहता वणी येथे खासगी कोविड सेंटरची मागणी मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे. वणीतील श्रीमंत व्यक्ती परसोडा येथील कोविड सेंटर वर उपचार करायला तयार नाहीत ते नागपूरला खासगी रुग्णलयात उपचार करून घेत आहेत, परंतु तिथेही बेड उपलब्ध होत नाहीत, करीता वणीत खासगी कोविड सेंटर ची मागणी जोर धरत आहे.

या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने असे खासगी कोविड सेंटर ला शासनाने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी गरीब जनतेला महात्मा फुले जण आरोग्य योजनेखाली मोफत मध्ये उपचार करून देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, विप्लव तेलतुंबडे यांनी केली .

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!