अखेर सावली नगरपंचायतला पाडावी लागली जीर्ण इमारत
अखेर सावली नगरपंचायतला पाडावी लागली जीर्ण इमारत
विदर्भ 24 न्युज च्या प्रयत्नांना यश
सावली शहरातील वार्ड नंबर ७ मध्ये निलकंठ हरी नारनवरे यांचे मातीचे घर होते. घर पूर्णतः मोडकळीस आलेले होते. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला रस्ता आहे त्या रस्त्याने घराशेजारील लोकं येणे-जाणे करतात व लहान मुले सुद्धा खेळत असतात. मागच्या वर्षी सुद्धा तक्रार केली होती यावर्षी सुद्धा वारंवार तक्रार करून सुद्धा ना घरमालक घर पाडत होते ना नगरपंचायत.

परिसरातील व्यक्तींनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद लाटेलवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. रुपचंद लाटेलवार यांनी त्यांच्या विदर्भ 24 न्युज या न्युज पोर्टलला “शहरातील जीर्ण इमारतीकडे सावली नगरपंचायतचे दुर्लक्ष” या मथळयाखाली बातमी लावली व वारंवार नगरपंचायत मध्ये जाऊन आपली मागणी रेटून धरली शेवटी नगरपंचायत मुख्याधिकारी वजाडे मॅडम यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्या मार्फत जीर्ण इमारत पाडण्यात आली व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
परिसरातील नागरिकांकडून विदर्भ 24 न्युज व माहिती अधिकार तथा पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद लाटेलवार यांचे आभार मानले आहे.




