वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा – राजेश्वर डोडीवार.
*फुले शाहू आंबेडकर विचार मंच तोहोगाव – लाठी व विरूर – कविठपेठच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*
काल दिनांक २७/०८/२०२० ला तोहोगाव -सर्कल व विरुर सर्कल मध्ये धुमाकुळ करणा-या हिंसक वाघाचा व अस्वलीचा बंदोबस्त करण्याची मागणी फुले,शाहु,आंबेडकर विचार मंच तोहोगाव-लाठी सर्कल व विरुर- कविठपेठ सर्कल वतीने दोन्ही सर्कलमधील ग्रामस्थाच्या स्वाक्षरी ने मा. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दोन्हीही सर्कल मध्ये धुमाकुळ घालणाा-या नरभक्षक वाघाला व अस्वलीला जेरबंद लवकरात लवकर करण्यात अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, यांना सादर केले. या वेळी तोहोगाव लाठी सर्कलचे अध्यक्ष मा. विजय ठेंगरे, कविटपेठ-विरूर सर्कलचे अध्यक्ष मा. शनिदास खोब्रागडे संस्थापक संचालक मा. गोपाळराव देवगडे, प्रमुख मार्गदर्शक मा. गणपतराव उपरे, मा. मधुभाऊ वानखेडे, तोहोगाव लाठी सर्कलचे महासचिव, मा. राजेश डोडीवार कविटपेठ-विरूर महासचिव सर्कलचे मा. भारत उपरे तोहोगाव लाठी सर्कलचे सचिव मा. रमेश मेश्राम, मा. सत्यपाल दुर्गे, मा. नरेश चहारे, मा. संतोष उपरे उपस्थीत होते .



