Vidarbh24News

Latest Online Breaking News

जिल्ह्यातील उर्वरित रस्ते व पुलाची कामे 2 वर्षात मार्गी लागणार

जिल्ह्यातील उर्वरित रस्ते व पुलाची कामे 2 वर्षात मार्गी लागणार

रस्ते व पुलाच्या ई-उदघाटन व भूमिपूजन प्रसंगी खासदार अशोक नेते यांची ग्वाही

गडचिरोली :-दि.30 आगस्ट
गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते, मोठे पूल, रेल्वे मार्ग व सिंचन प्रकल्पासाठी मी सतत प्रयत्नशील असून केंद्र सरकार कडून मोठया प्रमाणावर निधी मी खेचून आणला असून केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांच्या आशीर्वादाने पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील 777 कोटी रुपयांचा रस्ते व पुलांचे आज उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब असून जिल्ह्यातील उर्वरित दुर्गम भागातील रस्ते व पुलाचे बांधकाम मंजूर करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असून येत्या 2 वर्षात उर्वरित सर्व रस्ते व पुलाची बांधकामे पूर्ण होणार असून पुरामुळे व रस्त्यामुळे कोणताही नागरिक अडकणार नाही, अशी ग्वाही गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिली.
आज दि. 30 आगस्ट रोजी व्हिडिओ कान्स्फरिंग द्वारे केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी, जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते खासदार अशोक नेते, जिप अध्यक्ष अजय कंकडालवार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ई लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम पार पडला यावेळी प्रस्ताविकपर मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते बोलत होते.
पुढे बोलताना खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व जंगलाने व्याप्त असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याची सीमा आंध्रप्रदेश, छत्तीसगड व तेलंगाणा राज्य सीमेला जोडून आहे मात्र मोठ्या नद्यांवर पूल बांधकाम व दळणवळणाच्या सोयी सुविधा नसल्याने गडचिरोली जिल्हा इतर राज्यांशी जोडलेला नव्हता या बाबींची जाण मला होती व मी खासदार झाल्याबरोबर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते व पुलांच्या बांधकामाची मागणी केंद्र शासन व केंद्रिय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे रेटून धरली व त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सडक, परिवहन व राजमार्ग मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांच्या आशीर्वादाने गडचिरोली लोकसभा क्षेत्रात 12 हजार 286 कोटींची रस्ते व पुलाची कामे मंजूर झाली व त्यापैकी राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगती पथावर असून प्रमुख पुलाचे काम पूर्ण होऊन आज त्याचे उदघाटन होत आहे ही गडचिरोली वासीयांसाठी आनंदाची बाब आहे. आणि एवढ्या वरच मी थांबणार नसून जिल्ह्यातील उर्वरित दुर्गम भागातील रस्ते व पुलाचे बांधकाम मंजूर करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असून येत्या 2 वर्षात उर्वरित सर्व रस्ते व पुलाची बांधकामे पूर्ण होनार असून पुरामुळे व रस्त्यामुळे कोणताही नागरिक अडकणार नाही अशी ग्वाही गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!