**जगतीक मूलनिवासी दिवस साजरा**
**जगतीक मूलनिवासी दिवस साजरा**
आज दि.९ऑगस्ट २०२० रोज रविवार ला मंल्लेरा येते जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेने सन १९९४ पासून मूलनिवासी लोकांचे रुढी, परंपरा चालीरीतींची जोपासना व्हावी, त्याच्या कलेला वाव मिळावा म्हणून दरवर्षी जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे मंल्लेरा येथे जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रतिष्ठित नागरिक श्री चिंनाजी कोवे व ध्वजारोहणला गावातील वरिष्ठ श्री. वसंत ईष्टाम,श्री सदाशिवश् तोरे चंदूजी मरापे ,श्री सीताराम आलम सूत्रसंचालन श्री विजय सिडाम यांनी केले. या कार्यक्रमाला श्री. गोपीनाथ वेलादी, श्री प्रभाकर मरापे , श्री अनिल कोवे ,आनंद मडावी , नितेश सिडाम, विलास ईष्टाम ,संदीप सिडाम, ,रवी तोरे, व तसेच गावातील आदिवासी बांधव व आदी गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.



