Vidarbh24News

Latest Online Breaking News

घरासाठी कर्ज झाले स्वस्त,आता प्रत्येकाचे होणार स्वप्न पूर्ण

*घरासाठी कर्ज झाले स्वस्त*

एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने नव्याने घरासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर केवळ 6.90 टक्‍के इतका केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मात्र, हे कमी दराचे व्याजदर सिबिल स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशांना उपलब्ध आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. नव्याने घरासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्यांना हा कमी दर लागू होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत घर घेणाऱ्यांना चालना मिळावी याकरिता आम्ही व्याजदरात कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना लागणारा हप्ता कमी होणार आहे. किफायतशीर घरांची मागणी वाढावी याकरिता हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आलेला आहे.

या अगोदर या कंपनीने एप्रिल महिन्यात 800 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणाऱ्यासाठी घरासाठीचे कर्जाचे व्याजदर 7.5 टक्‍के केले होते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरांमध्ये मोठी कपात केली आहे. त्यामुळे आम्हाला स्वस्तात भांडवल उपलब्ध होत आहे. सध्या आम्हाला 5.6 टक्‍के दराने भांडवल उपलब्ध होते. त्या परिस्थितीचा विचार करून आम्ही व्याजदरांमध्ये कपात केली असल्याचे मोहंती म्हणाले. नव्या ग्राहकांनी या किफायतशीर योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

रिझर्व्ह बॅंकेने गेल्या चार महिन्यांत रेपोदरात मोठी कपात केल्यानंतर बॅंका आणि वित्तीय संस्था कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात वेगाने कपात करीत आहेत. त्यामुळे काही ठेवीवरील व्याजदर महागाईच्या दरापेक्षा कमी झाले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी व्याजदर कमी पातळीवर राहण्याची शक्‍यता आहे.

मोरॅटोरियम अनेकांना नको

कर्जाचा हप्ता देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांची सवलत दिली आहे. मात्र, आमच्या केवळ 25 टक्‍के ग्राहकांनी घर कर्जासंबंधात हप्ता पुढे ढकलण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ही समाधानाची बाब आहे. त्याचबरोबर विकसकांना बांधकामासाठी 13 हजार कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. त्यातील 9 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य घेतलेल्या विकासकांनी कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!