Vidarbh24News

Latest Online Breaking News

*ताडोबाच्या प्रवेशद्वारावर दोघांकडून वाघाच्या १२ नग मिश्या जप्त*

*ताडोबाच्या प्रवेशद्वारावर दोघांकडून वाघाच्या १२ नग मिश्या जप्त*

दोन आरोपीना अटक, दोन संशयित ताब्यात

चंद्रपूर-चंद्रपूरहून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पहिले प्रवेशद्वार असलेल्या पद्मापूर येथील तपासणी नाक्यावर दुचाकीने जाणाऱ्या दोघांकडून वाघाच्या १२ नग मिश्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी त्या दोघांना अटक करण्यात आली. तसेच वनविभागाने त्यांची झडती घेतली असता पुन्हा दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी या घटनेला दुजोरा दिला. ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर गेट तपासणी नाक्यावर वाहनाची व व्यक्तीची तपासणी करण्यात आली. दरम्यान मोहर्लीवरून येणाऱ्या एका दुचाकीने दोन इसम पद्मापूर गेटवर पोहचताच त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्यांच्याजवळ वाघाच्या १२ नग मिश्या आढळून आल्या. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. दोघांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासामध्ये आणखी दोन इसमांची नावे समोर आल्याचे समजते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!