अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाही करा. अखिल मादगी समाज संघटन राजुराची मागणी.
भुपेष मेश्राम विदर्भ २४ न्युज विरुर.स्टे. प्रतिनिधी 9767170791
अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाही करा*
===================
*अखिल मादगी समाज संघटन राजुराची मागणी*
*राजुरा प्रतिनिधी*
अडीच वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची माणुसकीला काळीम फासणारी घटना सावली तालुक्यातील पथारी गावात घडली. माणसाच्या मनाला हेलवून टाकनाऱ्या या घटनेचे सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून त्या नाराधामावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन अखिल मादगी समाज संघटना राजुरा तर्फे देण्यात आले.
समाजात दिवसेंदिवस बलात्काराचे प्रकरण समोर येत आहे. आधुनिक युगात मुलींना बाहेर जाऊन आपले जीवमान सुधारण्याची वाव या काळात आपल्या जीवावर बेतले आहे. एक वर्षाचा मुली पासून तर सत्तर वार्षयचा वृध्द महिलेवर अत्याचार होताना दिसून येत आहे. अशीच माणुसकीला काळीम फासणारी घटना सावली तालुक्यातील पथारी गावात घडली. दोन वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने. सर्वत्र या घटनेचे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. माणसाच्या मनाला हेलवून टाकनाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा नराधम विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल मादागी समाज संघटना राजुरा तर्फे प्रदेश उपा अध्यक्ष प्रकाश संभाजी चेनुर वार जिल्हा अध्यक्ष शंकर पेगडपेलिवार विदर्भ अध्यक्ष वनिता लाटेलवार, बाबुराव कमलेवार तसेच राजुरा शहर प्रमुख मारोती आईलवार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.



