चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित..
चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर हे गाव जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जैरामपूर येथील एक रूपण कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या गावातील नागरीकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच बाहेरील व्यक्तीस गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्याशी सबंधित कर्मचारी व तालुका प्रशासनाने परवानगी दिलेल्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे. हे आदेश २० जुलै रोजी पासून पुढील आदेशापर्यंत राहणार आहेत.



