Vidarbh24News

Latest Online Breaking News

बारावीच्या परीक्षेत तालुका स्तरावर यशोधरा घोटेकार दुसऱ्या क्रमांकावर

बारावीच्या परीक्षेत तालुका स्तरावर यशोधरा घोटेकार दुसऱ्या क्रमांकावर 

कवठी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली अंतर्गत विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची क्रमवारी संपादित केली आहे यामध्ये विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील कला विभागाचा निकाल 90.24% लागला असून कला विभागातुन कु. यशोधरा प्रकाश घोटेकार कवठी या विद्यार्थीनीने 84.30% गुण मिळवून सावली तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. सावली वरून कवठी सात (7) किलोमिटर  अंतर यशोधरा शाळेमध्ये येरझारा  सायकल ने प्रवास करीत होती आणि विशेष असे कि, शाळा सूटल्यानंतर घरकाम आणि शेतीकाम करून नियमितपणे अभ्यास करणे असे तिने तिच्या यशाचे गमक सांगितले आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई, वडील, परिवार आणि विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयाला दिले आहे तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली असल्यामुळे महाविद्यालयातील शिक्षकवृंदानी आणि गावकऱ्यानी यशोधरा चे अभिनंदन केले आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!