Vidarbh24News

Latest Online Breaking News

पाचगाव येथे विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजूरा शहर /तालुका प्रतिनिधी 8855994001.

 

*पाचगाव येथे विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*

शिवसेना नेते नगरसेवक राजू डोहे आणि माजी उप-जिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या मार्गदर्शनात पाचगाव येथे विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला.

मागील काही दिवसात जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील शिवसेना बळकट होताना पाहायला मिळत आहे.

राजुरा तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समझल्या जाणाऱ्या पाचगाव येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण नुलावार, सामाजिक कार्यकर्त्या सौ कलावती इंदूरवार, सौ शशिकला वाकुलकर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला.

पाचगाव-आर्वी क्षेत्रातील मुख्य ग्रामपंचायत असलेल्या पाचगाव येथे विद्यमान पंचायत सदस्या या भाजपच्या असून प्रवेशकर्त्या महिला त्यांच्या समर्थक असल्याचे बोलले जाते.

एकप्रकारे भाजप सफाई मोहीम चालली कि काय अश्या प्रकारचे चित्र राजुरा तालुक्यात सध्या बघायला मिळत आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे नेते निलेश गंपावार, पाचगावचे शाखाप्रमुख मनोज कुरवटकर, युवाशाखा प्रमुख सुनील गौरकार, संदीप घ्यार, अरुण नुलावार, प्रशांत भेंडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!