घुग्गुस वणी मार्गावरील पुल 22 जूनपासून 1 महीना बंद . या मार्गावर करावी लागणार वाहतूक……..
घुग्गुस वणी मार्गावरील पुल 22 जूनपासून 1 महीना बंद .
या मार्गावर करावी लागणार वाहतूक……..
घुग्गुस वणी मार्गावरिल वर्धा नदीच्या पुल हा जीर्ण अवस्थेत नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.22 जून पासून तब्बल 30 दिवसांकरिता सर्व प्रकारचा वाहनाना रहदारिस बन्द करण्यात येणार आहे.त्या मार्गवरिल येणाऱ्या सर्व वाहनाना पर्यायी मार्ग दिला जाणार आहे.
पर्यायी मार्ग हा– वणी ते चारगांव चौकी — आबई फाटा –शिंदोला – मुंगोलि– नाकोड़ा घुग्गुस असा असणार आहे.
घुग्गुस -वणी पुलाचे बांधकाम 1985 दरम्यान बनविन्यात आला होता .मात्र हा पूल आता पूर्ण जीर्ण झाला आहे. पुलाचा अनेक सदाखि निघाल्या होत्या.या पुलावरुणं जाताना कसरत करावी लागत होती. या रस्त्यावर दिवस रात्र चंद्रपुर, यवतमाळ ,कोरपना मुम्बई पर्यन्त छोटी मोठि वाहने ये – जा करतात.तसेच इथे पंक्चर व्हायचे व मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ झाली होती.
डॉ. महेश्वर रेड्डी पुलिस अधीक्षक चंद्रपुर ,महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1),ब अन्यवे कायदेशीर जनतेला धोका,अड्थड़ा किंवा ग़ैरसोय होउ नये तसेच कोणत्याही प्रकारे अपघात होऊ नये याकरिता प्रमुख राज्य क्रमांक 14 वणी -घुग्गुस पुलाचे काम करने असल्याने सदर रस्ता 22 जून ते 30 जून पर्यन्त बंद करण्यात येणार आहे.वाहतूक दारानी वरील मार्गाचा अवलंब करावा ऐसे जनतेला निर्देश देण्यात आले आहे.



