Vidarbh24News

Latest Online Breaking News

तथास्तु फाउंडेशन सिंदेवाहीतर्फे गुरुनानक देवजी यांची ५५७ वी जयंती साजरी; ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

सिंदेवाही, दि. २४ नोव्हेंबर २०२६ :

थोर संत, समाजसुधारक आणि मानवतेचे उपासक गुरुनानक देवजी यांच्या ५५७ व्या जयंतीनिमित्त तथास्तु फाउंडेशन सिंदेवाहीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.

गुरुनानक देवजी यांनी संपूर्ण जगाला एकता, समानता, प्रेम, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांची शिकवण दिली. त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे असून, सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे, हा मानवतेचा संदेश त्यांच्या विचारांतून मिळतो. याच विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तथास्तु फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी तथास्तु फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल उंदीरवाडे, सचिव महंत मेश्राम, कोषाध्यक्ष सुशील वाघमारे, स्वप्निल राऊत, जयंत भेंडारे, पोरस गेडाम व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलाशभाऊ टहलियानी होते. तसेच सिंधी समाजाचे अध्यक्ष मनोज धामेजा, जितेंद्र भवानी आणि आयुष भवानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरुनानक देवजी यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा जपत समाजसेवा आणि जनकल्याणासाठी असे विविध उपक्रम यापुढेही राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!