Vidarbh24News

Latest Online Breaking News

संविधान दिनाचे औचित्य साधून जे. बी. ज्युनिअर कॉलेज वरोरा येथे विविध उपक्रमांचे आयोजन

वरोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि जे. बी. ज्युनिअर कॉलेज, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान मूल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बार्टी पुणेच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील समतादूत श्री. रमेश मडावी यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानाचे सामाजिक जीवनातील स्थान आणि सर्व नागरिकांनी त्याचे पालन करण्याची गरज यावर विशेष भर दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्या अर्चना बनसोड मॅडम यांनी संविधानातील आजची परिस्थिती, समाजातील बदल आणि नागरिकांची जबाबदारी या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. “संविधान जोपासणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. नगराळे सर यांनी केले. तर उद्देश वाचिकेचे वाचन भाग्यश्री मेश्राम या विद्यार्थीनीने करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
तसेच सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्साहाने संविधान दौड मध्ये सहभाग नोंदवून संविधान मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड सर, निबंधक अतुल लोंढे सर, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले सर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

संविधान दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता आणि मूल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!