माजी राज्यमंत्री स्व. बाबुराव मडावी यांना गडचिरोली येथे वाहिली आदरांजली,
माजी राज्यमंत्री स्व. बाबुराव मडावी यांना गडचिरोली येथे वाहिली आदरांजली,
विदर्भ 24 न्यूज.
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली :– आदिवासींच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे तसेच गडचिरोली जिल्हा निर्मितीचे शिल्पकार,माजी राज्यमंत्री स्व. बाबुराव मडावी, यांना पुण्यतिथीनिमित्त १६ जून रोजी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयानजीकच्या कै. बाबुराव मडावी चौकात आदरांजली अर्पण करुन त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकन्यात आले. यावेळी नगरसेवक गुलाबराव मडावी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी, कैलाश मडावी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, कार्याध्यक्ष माधव गावळ, कोषाध्यक्ष आनंद कंगाले,सचिव सदानंद ताराम , राकेश चांदेकर,देवराव अलाम, माजी नगरसेविका वर्षा शेडमाके, नारी संघटनेच्या अध्यक्षा जयश्री येरमे, सामाजिक कार्यकर्त्या कुसमूताई अलाम, वर्षाताई राजगडे, अमरसिंग गेडाम,हर्षल मडावी, सूरज मडावी, मुकुंदा सिडाम, वनिश्याम येरमे, यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी स्व. बाबुराव मडावी यांना आदरांजली अर्पण केली.



