Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावली तालुक्यातील अपंग बांधवाना तीनचाकी सायकलचे वाटप*

*विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून अपंग बांधवाना मदतीचा हात*

*दिनांक :- ०२ जानेवारी २०२४*

*सावली (ता.प्र.):- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून जनसंपर्क कार्यालय सावली येथे सावली तालुक्यातील अपंग बांधवाना तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले.*

*याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार मानीत जनसेवेचे व्रत धारण केलेले आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक आहेत आपल्या विजयकिरण फाउंडेशन च्या माध्यमातून ते निराधार शोषित,पीडित व आजारी व्यक्तीच्या मदतीला नेहमीच धावून येतात, लोकसेवत त्यांनी स्वतःला अर्पण केले आहे, त्यांचा आदर्श आज प्रत्येक नेत्यांनी घ्यावा, व जनसेवा करावी असे त्यांनी प्रतिपादन केले.*

*यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी, न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से,मा.सचिन संगीडवार,,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार,माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार,मा.अनिल गुरनुले,मा.जयंत संगीडवार,मा.किशोर घोटेकार,मा.मिथुन बाबनवाडे,मा.पंकज कागदेलवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सौ.शिला गुरनुले,मा.बादल गेडाम,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!