नविन वर्षांच्या पूर्व संध्येला बोथली रोडवर पिकअपची दुचाकीला ठोकर*
*एक जागीच ठार*
विक्की अजय कोंकावार राहणार बोथली वय २६ वर्षे आपल्या दुचाकी क्र. एम एच ३४ सी सी २१६५ गाडीने बोथली वरून सावलीला कामानिमित्त येत असताना सावली वरून बोथलीकडे जात असलेल्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान पिकअपने धडक दिली यामध्ये विककी अजय कोंकावार हे जागीच ठार झाले.

विक्की अजय कोंकावार एकुलता एक कमावता असल्याने यांच्या अचानक जाण्याने घरच्या लोकांवर संकट कोसळले आहे. नववर्षाच्या पूर्व संध्येला बोथली गावात शोककळा पसरली आहे.



