Vidarbh24News

Latest Online Breaking News

अन त्या कुटुंबाचे दुःखाश्रू झाले अनावर…

*विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोहुर्ले कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत.*

*दिनांक : २७ नोव्हेंबर २०२३*

*सावली(ता.प्र.):- विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री.विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.व्याहाड बुज येथील कु.समीक्षा रवींद्र मोहुर्ले वय १६ वर्षे ही इयत्ता १०वि मध्ये शिकत असताना तिला मेंदूचा त्रास जानवत होता,त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार चालु होता उपचारा अंती त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले,मोहुर्ले कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडे आर्थिक मदतीसाठी धाव घेतली तात्काळ मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांच्या करवी मोहुर्ले कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवली होती.*

*कु.समीक्षा रवींद्र मोहुर्ले यांचा पुढील उपचार नागपूर मेडिकल कॉलेज येथे सुरु असताना त्या मरण पावल्या,अल्प कालावधीमध्ये आपल्या तरुण मुलीला गमल्याने दुखात असलेल्या मोहुर्ले कुटुंबियांना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आधार देत त्यांचे सांत्वन केले व त्यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितिन गोहने यांच्या माध्यमातून आर्थिक मदत पाठवली.*

*आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ता मा.सुनिल बोमनवार ,व्याहाड बूज.च्या माजी सरपंच सौ.वंदनाताई गुरनुले,माजी सरपंच मा.पितांबर वासेकर ,माजी ग्रामपंचायत सदस्य मा.अनिल गुरनुले, माजी ग्रामपंचायत सदस्य मा.सचिन इंगुलवार,आणी मा.जयंत संगीडवार मा.दीपक गद्देवार,मा.बंडू चीप्पावार तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!