Vidarbh24News

Latest Online Breaking News

भाजपा ओबीसी जागर यात्राचे व्याहाड खुर्द येथे जंगी स्वागत व सभा*

सावली (रुपचंद लाटेलवार)
सावली तालुक्यातील व्याहड खुर्द येथे ओबीसी जागर यात्रेचे भाजपा ओबीसी मोर्चा तालुका सावली तथा जिल्हा चंद्रपूरच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ढोलताशा, फटाक्याच्या गर्जनाने जंगी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने ओबीसी मोर्चा महाराष्ट्रचे प्रभारी मान.माजी आम श्री.आशिषजी देशमुख व श्री संजयजी गाते प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री हरिश भैय्या शर्मा, यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे प्रभारी आशिष देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक योजना राबविण्यात सरकार चा फार मोठा वाटा आहे.ओबीसी च्या हक्कासाठी व ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपा सरकार पाठीसी आहे व येणार्या २०२४ निवडणुकीत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात भाजपाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. यावेळी संजय गाते प्रदेश अध्यक्ष, हरिश भैय्या शर्मा जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी ओबीसी च्या विविध योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमाला प्रभारी आशिष देशमुख, प्रदेश अध्यक्ष संजय गाते, जिल्हाध्यक्ष भाजपा हरिष शर्मा,रविंद्र चव्हाण प्रदेश संपर्क प्रमुख ,सौ अर्चनाताई डेहनकर प्रदेश महामंत्री, विनोद गुळदे पाटील प्रदेश सचिव,डी डी सोनटक्के प्रदेश उपाध्यक्ष, कमलाकर घाटोदे प्रदेश उपाध्यक्ष, रविंद्र येनुरकर पुर्व विदर्भ प्रमुख, अविनाश पाल जिल्हाध्यक्ष, प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य, जितेश सोनटक्के तालुका अध्यक्ष, सतिश बोमावार महामंत्री, विनोद धोटे युवा अध्यक्ष, आशिष कार्लेकर शहर अध्यक्ष, पुष्पाताई शेरकी महिला अध्यक्ष, कविंद्र रोहणकर, आदी भाजपा ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री अविनाश पाल. संचालन क्रिष्णा राऊत, आभार प्रदर्शन गिरीश चिमुरकर यांनी केले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!