Vidarbh24News

Latest Online Breaking News

बालमजुरी विरोधात अभियान, विविध उपक्रमाचे आयोजन

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त दि. 12 जून, 2023 कैलास संत्यार्थी चिल्डेन्स फाउंडेशन अमेरिका यांचे सहकार्याने व रुदय सामाजिक संस्था संस्था, गडचिरोली यांचे व्दारा संचालित ‘असेस टु जस्टिस’ प्रकल्पांतर्गत व रेल्वे चाईल्ड लाईन, बल्हारशा , जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर, जिल्हा चाईल्ड लाईन, यांचे सयुक्त विध्यामाने रेल्वे स्टेशन, बल्हारशाह येथे दिनांक १२ जुन २०२३ रोजी ‘ जागतिक बाल कामगार विरोधी दिन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक म्हणून रेल्वे चाईल्ड लाईनचे संचालक मा.फा.थोमसन पुल्लेशेरी, अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण गाडवे, रुदय सामाजिक संस्था , गडचिरोलीचे कार्यकारी संचालक काशीनाथ देवगडे, शेशिकांत मोकाशे, आनंराव मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक रुदय संस्था, अभिषेक मोहुर्ले, जिल्हा चाईल्ड लाईन, चंद्रपूर , भास्कर ठाकूर, रेल्वे चाईल्ड लाईन , बल्हारशाह, अन्सार खान, पोलीस हवालदार, शासकीय रेल्वे पोलीस,आदी मान्यवर उपस्थित होते .
रेल्वे स्टेशन परिसर व बल्लारपूर मध्ये राॅलीकाढण्यात आली व पत्रके वाटण्यात आली,रेल्वे स्टेशन बल्हारशाह,प्रबंधक श्री.रविद्र नंदनवार, प्रमोद रासकर,सहायक पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन,बल्हारशाह, डॉ.गजानन मेश्राम वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,बल्लारपूर .सुनिल तुंगीळवार, अ.क्र .तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर. परिसरामध्ये अधिकारी यांनी सहभागी झाले व बालमजुरी विरोधात स्वाक्षरी मोहीम घेऊन या अभियानाला सुरुवात करण्यात आली.


या कार्याचा उद्देश बाल कामगारांना त्यांचे बाल वयात कामावर ठेवल्यामुळे त्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा येऊन त्यांचे बालपन हिरावले जाते. त्यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होत नाही. परिणामत: बाल कामगारांचे वैयक्तीक, त्यांचे कुटुंबियांचे नुकसान होऊन देशाच्या विकासात अडथळा येऊ शकतो. बाल कामगारांना त्यांचे बाल वयात काम करावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते व ते शिक्षणापासून वंचित राहतात, बाल वयातच कामाच्या ठिकाणी बालकांचे शोषण करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने, हॉटेल, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज आणि इतर ठिकाणी बाल अन् किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये. असे केल्यास हा कायद्याने गुन्हा ठरेल, अशी माहिती मा.अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली.
कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री.काशिनाथ देवगडे, कार्यकारी संचालक रुदय, गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की,‘‘१४ ते १८ वर्षे वयोगटातील बालकास धोकादायक नसलेल्या व्यवसायात काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियमन १९८६ अन्वये १४ वर्षांखालील बालकास धोकादायक आणि विनाधोकादायक व्यवसाय प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’ असे म्हणाले व आपल्या देशात बाल मजुरी रोखण्यासाठी प्रभावी धोरण व सशक्त कायदे आहेत, परंतु जोपर्यंत लोकांमध्ये जागृती येत नाही, संपूर्ण समाज आपली जबाबदारी समजून काम करणार नाही तोपर्यंत ही समस्या एक आव्हान म्हणूनच राहील, आम्ही भारताला बाल मजुरी मुक्त करण्याबरोबरच प्रत्येक बालकाला स्वस्थ, आनंददायी, सुरक्षित आणि स्वतंत्र बालपण देण्यासाठी कठीण परिश्रम करीत आहे त्यात निश्चितच यशस्वी होऊ.असे म्हणून आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना (आय. एल.ओ.) च्या बालमजुरी जागतिक अनुमान २०२० निकाल आणि पुढील मार्ग च्या अहवालात नुकसान २०२०च्या सुरुवातीला संपूर्ण जगात १६ करोड बालक बालमजुरी च्या चपेटमध्ये होते त्यात ०६.३ करोड मुली तर ०९.७ करोड मुले होती, यांचा अर्थ जगातील प्रत्येक १० बालकांपैकी एक बालक बाल मजुरी करण्यासाठी मजबुर आहे, बाल मजुरी ला घेऊन भारतात सुद्धा परिस्थिती गंभीर आहे,२०११ च्या जनगणनेनुसार देशात पाच ते चौदा वर्षांच्या वयोगटातील मजुरांची संख्या १.१० करोड होती ते देशातील एकूण मुलांच्या संख्येच्या ३.९टक्के आहे व आपणास विचार करायला लावणारी आहे असे म्हणाले.
बाल संरक्षण व त्यांचे कायदे या विषयी शिशीकांत मोकासे यांनी सविस्तर माहिती दिली.या कार्यकर्माचे संचालन व प्रस्थाविक भास्कर ठाकूर ,समन्वयक रेल्वे चाईल्ड लाईन यांनी केले तर आभार अभिषेक मोहुर्ले, समन्वयक जिल्हा चाईल्ड लाईन यांनी मानले. या कार्यक्रमात संस्थानाचे पधाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!