Vidarbh24News

Latest Online Breaking News

चिचडोह बॅरेजवर चार युवकाचा बुडून अंत

चामोर्शी : मोनु शर्मा, शुभम लांजेवार, महेश घोंगडे, प्रशांत येलुरे हे मित्र रविवारची सुट्टी आहे म्हणून पार्टी करण्याशाठी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार १४मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती पुढे येत आहे. हे चारही मित्र १८ ते २५ वयोगटातील असल्याने व घरातील नवयुवक असल्याने सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज वर काही मित्रमंडळी रविवार १४ मे रोजी पार्टी करण्याकरिता गेले असल्याचे कळते. दरम्यान त्यातील काहींना पाण्यात पोहण्याचा व आंघोळ करण्याचा मोह न आवरल्याने त्यांनी पाण्यात प्रवेश केला. पाण्याची खोली न कळल्याने चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळविण्यात असून या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.. सदर घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!