Vidarbh24News

Latest Online Breaking News

एकावेळी चार मोबाइल वापरा व्हॉटसअप!

मार्क झुकरबर्गने दिली माहिती

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने एक मोठा बदल केला असून, आता तुम्हाला एकाच मोबाइल नंबरचे व्हॉट्सअॅप खाते चार फोनवर वापरता येणार आहे. सध्या व्हॉट्सॲप वेबच्या मदतीने एकाच अकाउंटला फोन आणि पीसीवर वापरता येते. आता है फीचर मोबाइलसाठीही उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवीन फीचरची माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचे हे फीचर काही आठवड्यांत सर्व यूझर्सपर्यंत पोहोचेल. त्यांनी लिहिले की, आता तुम्ही एकाच वेळी चार फोनवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन करू शकाल.
काय आहे नवीन फीचर ?

१ व्हॉट्सअॅपच्या या नवी फीचरमध्ये तुम्ही एका वेळी चार मोबाइलवर एक व्हॉट्सअॅप खाते वापरून लॉगइन करू शकाल.

| पहिल्या मोबाइलमध्ये नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअॅप वापरकर्ते इतर दुसऱ्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपचे संदेश वाचण्यासह इतर कामे करू शकतील.

3 | वापरकर्त्याला मेसेज येईल तसेच तो पाठवूही शकेल.परंतु पहिल्या मोबाइलमधी व्हॉट्सअॅप अकाउंट राहिल्यास, अकाउंट इतर मोबाइलमधून आपोआप लॉगआउट होईल.

बंदी कुठे?

चीन, इराण, सीरिया, संयुक्त अरब अमिराती, उत्तर कोरियामध्ये व्हॉट्सअॅपला बंदी आहे.

कसे वापराल हे फीचर ? जर व्हॉट्सअॅप वापरकर्त्याला एका मोबाइलसह इतर मोबाइलवरही व्हॉट्सअॅप वापरायचे असेल तर त्याला दुसऱ्या मोबाइलमधील दीर्घकाळ निष्क्रिय व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशनवर जाऊन पहिल्या मोबाइलचा फोन नंबर टाकावा लागेल.

यानंतर पहिल्या फोनवर ओटीपी येईल.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही इतर मोबाइलवरही लॉग इन कराल.

याचवेळी पहिल्या मोबाइलमधील कोड स्कैन करून इतर उपकरणेदेखील जोडली जाऊ शकतात.

आणखी एक भन्नाट फीचर येणार

व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत असून, त्याला त्यांनी व्हॉट्सअॅप चॅनल असे म्हटले आहे. माध्यमे, यू-ट्यूबवर शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय अशांना आपल्या कम्युनिटीला अपडेट देण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!