Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुक्तानंद… स्वच्छंद जीवनाचं गुरुकुल

ए.जे.फाउंडेशन चा उपक्रम
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
ए.जे. फाउंडेशन गडचिरोली तर्फे दि.२१ एप्रिल ते २३ एप्रिल असे तीन दिवशीय १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी ‘मुक्तानंद’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांना नैसर्गिक वातावरणात मुक्त आनंद देण्यासाठी शिबिराचे आयोजन चौधरी फार्म हाऊस खरपुंडी रोड,दिभना या परिसरात घेण्यात आले होते. अगोदरच्या दिवशी रात्री वादळ, वारा आणि पाऊस पडला होता तरीपण ५९ पालकांनी आपल्या पाल्यांना शिबिर स्थळी आणून दिले.


शिबिराची सुरुवात योगा आणि श्रमदान करून करण्यात आली. हसत खेळत परिचय, गणितीय खेळ, स्वतःच्या चांगल्या वाईट सवयी, दुर्बिणीच्या साह्याने पक्षी निरीक्षण, शेतशिवारा जवळ असणाऱ्या नदीत वाळूमध्ये मुक्त स्वच्छंद खेळण्या बागळण्याचा मनमुराद आनंद लहान मुलांना अनुभवता आला.संध्याकाळी प्रार्थना दिवसभरातील अनुभव ,शिबिरा विषयीचे मनोगत घेण्यात आले.रात्री आठ वाजता शेतशिवारातील चुलीवरील साधे जेवण आणि झोपण्यापूर्वी गटचर्चा असे लहान मुलांच्या आवडीचे विषय घेण्यात आले.
रात्री आलेला वादळ, वारा आणि पाऊस याचाही प्रत्यक्ष अनुभव बालकांनी मुक्तपणे घेतला. या वादळवाऱ्यात सावली आणि जेवनासाठी टाकलेला मंडप पालापाचोळ्यासारखा उडून गेला आणि आयोजकांची चिंता वाढली. तरीही दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात योगा,दुसऱ्या सत्रात डॉ. अद्वय अप्पलवार यांचे डोळ्यांची काळजी आणि आहार याविषयी मार्गदर्शन झाले. लगेच प्राची मॅडम पुणे यांनी चित्रकला आणि पेंटिंग यावर कृतीयुक्त सत्र घेतले.
वातावरणाचा रौद्र रुप लक्षात घेऊन शिबिराची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या तेव्हा मात्र शिबिरातील मुले खूप हळहळली.मुलांना घरी जायचे नव्हते. त्यांना तिन्ही दिवस शेत शिवारातील शिबिराचा मुक्त आनंद लुटायचा होता.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.केदार, प्रा.विक्रम वडसा,प्रा.देवानंद दुधे सावली, प्रा.वाल्मिक, प्रा
सुरज, प्रा. विलास वरोरा, प्रा. विवेकानंद चामोर्शी, प्रा मनीषा , प्रा.स्वाती, प्रा.प्राची पुणे आणि मंगलभाऊ इत्यादींनी खूप अथक परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!