*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन १३२ वी जयंती स्टूडंट कॉम्पुटर एज्युकेशनमध्ये साजरी*
सावली – डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्टूडंट कॉम्पुटर एज्युकेशन सावलीमध्ये एमएससीआयटी कॉम्पुटर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थांना आधुनिक भारताची निव राखणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचारित्र्यावर प्रकाश टाकण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा (ई टेस्ट) चे आयोजन करण्यात आले. यामधील प्रथम पुरस्कार स्नेहा सोनटक्के, व्दितीय पुरस्कार सृष्टि गोहने तर तृतीय पुरस्कार संतोषी गावळे या तिन विद्यार्थांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

परीक्षा आटोपल्यानंतर सर्व विद्यार्थांच्या उपस्थितीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. महामानवाला अभिवादन केल्यानंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टूडंट कॉम्पुटर एज्युकेशन संचालक रुपचंद लाटेलवार, संचालिका मानसी लाटेलवार, शिक्षक अमित डोंगरे, शिक्षिका काजल खोब्रागडे, करण चौधरी, ऋतिक शेंडे यांनी प्रयत्न केला.



