Vidarbh24News

Latest Online Breaking News

हवामान आधारित कृषी सल्ला

जाणून घ्या! हवामान आधारित कृषी सल्ला

शेतकऱ्यांनी पीक पेरणीचे नियोजन करावे

चंद्रपूर दि. 13 जून: शेतकऱ्यांना हवामानाबाबत कृषी विभागाकडून वेळोवेळी माहिती दिली जाते.शेतकऱ्यांनी कोणत्या हंगामात नेमके कोणते पीक घ्यावे. बियाणे कोणती वापरावी. जमिनीची मशागत, बीजप्रक्रिया तसेच त्या पिकांवर कोणत्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करावी. पिके घेण्यास कोणते हवामान अनुकूल आहे. सध्याचे हवामान कसे आहे, अशा वेगवेगळ्या घटकांची सविस्तर माहिती कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी, पेरणीयोग्य पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन शेतीकामाचे नियोजन करावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होते. किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसेच शेताची बांध बंदिस्त करून घ्यावी. शेतातील काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे व आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी.

खरीप हंगाम बियाणे खरेदी:

बियाणे खरेदी करतेवेळी टॅग, लेबल वरील सर्व माहिती पिकाचे नाव, पिकाची जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवणशक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचे नाव व पत्ता तपासून घ्यावे. तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती व बिल घ्यावे. त्यामध्ये बियाण्याचे नाव,पिक,वाण व बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी.

हिरवळीचे खत जमिनीची पूर्वमशागत ते बियाणे पेरणी:

शेतात पाण्याची मुबलक सोय असल्यास हिरवळीच्या खतांची पिके घ्यावीत.जेणेकरून पीक जमिनीत गाडल्यानंतर कुजून नत्राचे स्थिरीकरण होईल. जमिनीत सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता वाढेल. हिरवळीची खते शेतात सलग किंवा फळ पिकांमध्ये आंतरपीक म्हणून ठेवतात किंवा त्याच शेतात पीक फुलांवर येण्यास सुरूवात झाल्यानंतर शेतात ट्रॅक्टरने जमिनीत चांगल्या प्रकारे गाडल्या जाईल. या पद्धतीने दाबावे. हिरवळीच्या खताच्या पेरणीसाठी बोरू पिकाचे हेक्टरी 25 ते 40 किलो किंवा ढेंचा पिकाचे हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणे वापरावे.

जमिनीची पूर्वमशागत ते बीज प्रक्रिया:

धान पिक रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून व वखरून तयार करावी.100 सेमी रुंद व 10 ते 15 सेंटिमीटर उंच, योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंठ्यास तीन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत, 1 किलो युरिया व 3 किलो एस.एस.पी मिसळून द्यावे.

बीज प्रक्रिया:

संशोधित  धान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जाती करिता 35 ते 40 किलो आणि मध्यम व ठोकळ जाती करिता 50 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्राम मीठ (3 टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाने टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे व तळाखालींल निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

तूर जमिनीची पूर्वमशागत:

धान बांधीतील धुऱ्यावर तूर पीक घेण्यापूर्वी धुऱ्यावर नवीन माती टाकावी. तसेच धुऱ्यावरील तण काढून माती मोकळी करावी. पिकेव्ही तारा, आयसीपीएल 87119 (आशा), सी 11 या वाणांची निवड करून हेक्टरी बियाण्यांचे 10 ते 15 किलो वापरून 60×30 सेमी अंतरावर पेरणी करावी.पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

कापूस जमिनीची पूर्वमशागत व भरखते:

कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी. पेरणीपूर्वी एक वखर पाळी (जांभूळवाही) द्यावी. कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 12 ते 15 व बागायतीसाठी हेक्‍टरी 20 ते 25 गाडी चांगले मुरलेले शेणखत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळू द्यावे.

सोयाबीन पूर्वमशागत व भरखते:

जमिनीची 15 ते 20 सेंमी खोल नांगरण करून व दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. हेक्‍टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत वापरून नंतर जमिनीत मिसळण्याची वखराची पाळी द्यावी.

भाजीपाला जमिनीची पूर्वमशागत:

भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोलवर नांगरणी करून वखरणी करावी तसेच वखराच्या शेवटच्या पाडीत चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत.

कोविड-19 या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण:

कोविड-19 या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला मास्क लावावे. शेतात काम करताना लोकांमध्ये संपर्क टाळण्यासाठी तीन ते पाच फूट अंतर ठेवावे. समुदायामध्ये जवळजवळ एकत्र येऊ नये. हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनीटायजरचा वापर करावा. शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल धरावा व स्वतःची स्वच्छता राखावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
01:13