Vidarbh24News

Latest Online Breaking News

जि. प. शाळा कवठी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

*जि. प. शाळा कवठी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

*”प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येवर विविध स्पर्धाचे आयोजन”*

✍️टिकाराम म्हशाखेत्री
सावली तालुका प्रतिनिधी✍️

कवठी- सावली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटन कवठी च्या सरपंच कांताबाई बोरकुटे, तर अध्यक्षपद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर श्रीकोंडावर यांनी भुषविले, यावेळी उपसरपंच विलास बट्टे, पोलीस पाटील सचिन शिडाम, खोब्रागडे सर मुख्याध्यापक शहीद सुरेश पा. सुरकर विद्यालय कवठी, तं. मु. स. अध्यक्ष तथा पत्रकार टिकाराम म्हशाखेत्री, प्रा. वाकडे सर जिवती, ईश्वर बट्टे, विनोद धोटे, संजय घोटेकर, बेंडुजी बोरकुटे, गीतेश चिताडे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, गुरुदेव सेवा मंडळ सर्व सदस्य तथा गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी कवठी येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक पवार सर यांचे जि. प. शाळा कवठी च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तसेच जि. प. शाळा कवठी चे मुख्याध्यापक नैताम सर यांचे जगदंब क्रीडा मंडळ कवठी च्या वतीने शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सावित्री स्तवन सौ. सिंधु नैताम मॅडम यांनी म्हटले.
गेल्या अडीच वर्षामध्ये कोरोना संकटामुळे देशासह राज्यातील शाळा, कॉन्व्हेंन्ट, महाविद्यालये बंद होती, विद्यार्थी घरीच राहुन ऑनलाईन शिक्षणाचे धडे मोबाईल वरती घेत होते, या द्वारे शिक्षण दिले जात असले तरी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नव्हता, त्यांच्या अंगी असलेले विविध गुण दिसून येत. नव्हते, 2023 या वर्षात कोरोना संकट कमी झाले आणि विविध धार्मिक, सामाजिक, सण,उत्सव, कार्यक्रम घेतल्या जात आहेत, 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या पुर्व संध्येवर जिल्हा परिषद शाळा कवठी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यात एकल नृत्य, समुह नृत्य, देशभक्ती गिते, नक्कल असे आदी कार्यक्रम घेण्यात आले. लहान चिमुकल्या मुलांच्या नृत्याने प्रमुख अतिथि सह ,पालक प्रेक्षक वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नैताम सर, सातेवार सर, आत्राम सर, मांदाळे सर, कुळमेथे सर, वाकडे सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी संचालन दलांजे सर, तर आभार प्रदर्शन नैताम सर यानी केले. यावेळी विद्यार्थांच्या आई वडीलासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!