Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पारडी येथे दारूबंदीसाठी उसळला नागरिकांचा जनआक्रोश

*पारडी येथे दारूबंदीसाठी उसळला नागरिकांचा जनआक्रोश*

*ग्रामपंचायत हद्दीमधील रॉयल बार & रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्याची नागरिकांची मागणी*

✍️टिकाराम म्हशाखेत्री
सावली तालुका प्रतिनिधी✍️

पारडी- पारडी ग्रामपंचायतच्या हद्दीत भु. क्र.126 मध्ये बार & रेस्टॉरंट चालू करण्यासाठी अर्जदाराने ग्रामपंचायत पारडी चे नाहरकत प्रमाणपत्राकरिता ग्रामपंचायतला अर्ज सादर केलेला होता. त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने मासिक सभेत अर्जावर विचारविनिमय करून अर्जदारास कोणत्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे नाकारले होते. तरी सुद्धा अर्जदार यांनी नामे रॉयल बार & रेस्टॉरंट चालू करून दारू विक्री करण्यास सुरुवात केली.ती बार नाहरकत प्रमाणपत्र नसताना सुरु कशी झाली असा प्रश्न पदाधिकारी व नागरिकांना पडला आहे त्यामुळे उपसरपंच पारस नागापुरे, सदस्य केदार नागापुरे, तं. मु. स. अध्यक्ष रवी गेडेकार, माजी सभापती पं. स. सावली छाया शेन्डे, दिपक शेन्डे व संपूर्ण ग्रामस्थांनी मिळून जिल्हा उत्पादन शुल्क विभागाला अर्ज सादर करून पारडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणत्याही दारू दुकानदारास दारू विक्री परवाना देऊ नये. दिली असेल तर ग्रामस्थांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येईल असे अर्ज सादर केले असता, अर्जाची दखल घेत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातून दुय्यम निरीक्षक संदीप राऊत, जवान गोकुळ पवार यांनी येऊन समस्थ ग्रामवासियांचे रॉयल बार & रेस्टॉरंट या अनुज्ञप्ती विरुद्ध सामूहिक जवाब घेतला व तक्रारीत दिलेल्या सह्या या ग्रामपंचायती मधील मतदारांच्याच आहे याची शहानिशा केली. तसेच ग्रामवशियांना त्यांनी दिलेल्या तक्रारीत योग्य चौकशी करून अहवाल देण्यात येणार असे सांगण्यात आले.


पारडी गावात मागील अनेक दिवसांपासून दारूबंदी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नसताना सुद्धा हद्दीमध्ये बार & रेस्टॉरंट चालू झालेले आहे. असे यावेळी गावचे उपसरपंच पारस नागापुरे, तं. मु. स. अध्यक्ष रवी गेडेकार, छाया शेन्डे माजी सभापती पं. स. सावली, दिपक शेन्डे, सुनील चौधरी व गावातील नागरिकांनी विदर्भ 24 न्युज तालुका प्रतिनिधी टिकाराम म्हशाखेत्री यांचेशी बोलताना सांगितले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!