Vidarbh24News

Latest Online Breaking News

रासेयो शिबिरात सिकलसेल जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर

रासेयो शिबिरात सिकलसेल जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर …..
सावली ( लोकमत दुधे )
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने आयोजित महाविद्यालय स्तरीय विशेष शिबिर दिनांक १६ जानेवारी २२जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सिकलसेल व थैलसेमिया सोसायटी चंद्रपूर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च व प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव च्या वतीने सिकसेल जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. रूपल उराडे , सौ अरुणा जवादे , डॉ. स्वप्नील चांदेकर , डॉ. रवी गजभिये , विनोद उमरे, अमोल मून , जाकीर शेख आणि अरुण उराडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिबिरार्थी व गावकरी यांची रक्त चाचणी व सिकलसेल बद्दलची माहिती देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली डॉ. रूपल उराडे यांनी सिकलसेल व्याधीचाआपला प्रवास सांगून कोणताही असाध्य आजारावर मात करण्याची प्रेरणा तरुणाईच्या मनात निर्माण केली. डॉ. सप्नील चांदेकर यांनी सिकलसेल आजाराबद्दलची माहितीी देऊन तू दूर कसा करता येईल यावर सखोल मार्गदर्शन केलं , डॉ. रवी गजभिये यांनी इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च सेंटर याबद्दलची माहिती देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी डॉ. राजश्री मार्कंडेवार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. दिलीप कामडी, डॉ. रामचंद्र वासेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अक्षय मुद्रीवार यांनी केले तर आभार पायल राऊत हिने मानले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी बहुसंख्या गावकरी उपस्थित होते . यावेळी ५५ लोकांचे सिकलसेल रक्त चाचणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीवेतेसाठी ग्रामवासीयांचे सहकार्य लाभले …..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!