*संत निरंकारी सत्संग सेवादलानी घेतला स्वच्छतेसाठी पुढाकार*
*संत निरंकारी सत्संग सेवादलानी घेतला स्वच्छतेसाठी पुढाकार*
**सावली :-* येथील सावित्रीमाई फुले चौक येथे ग्रामस्वच्छता अभियान स्वच्छता दूत श्री. प्रशांत तावाडे, सावली यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आले. यावेळी सावित्रीमाई फुले चौक परिसरातील नाका परिसर व वार्डातील गल्लीमधील व नाली मधील केरकचरा उचलण्यात आला व त्याची विल्हेवाट योग्यरित्या नगरपंचायत सावलीच्या घंटागाडीमध्ये करण्यात आली.
यावेळी संत निरंकारी सत्संग मुखी श्री. परशुराम गुरनुले, संचालक श्री. देवरावजी मोहुर्ले, तथा सेवादल श्री. तथागत इंदुरकर, तुकाराम वाडगुरे, निराकार लेनगुरे, केदार सोनुले, मुकेश मोहुर्ले, नागेश मोहुर्ले, पत्रु गेडाम, तनिषा वाडगुरे, इंदिरा मलोडे, शारदा लेनगुरे, तेजस्विनी वाडगुरे, कुसुमबाई रस्से, नूतन मोहुर्ले, व इतर सत्संग मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग दर्शवून जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन आपला परिसर नेहमी स्वच्छ कसा राहील याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन करून सदर स्वच्छतेचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.



