राष्ट्रीय महामार्गावर केशव झरकर यांचा अपघाती मृत्यू
श्री केशव शिवराम झरकर रा.हिरापूर त.सावली जिला चंद्रपूर वय 50वर्ष यांचा मुल- गडचिरोली हाय वे मार्गावर फळरोप वाटिका हिरापूर/व्याहाड खुर्द चया गेट समोर आज एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला.ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथे नेताना वैनगंगा नदीच्या पुलावर गाडीमध्येच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आईवडील असा आप्त परिवार आहे
राष्ट्रीय महामार्गावर चार दिवसांत चार अपघात- नागरिकांची गती रोधक लावण्याची मागणी
चंद्रपूर गडचरोली महामार्गावर रोजच अपघात होत असतात. तरी प्रशासनाने गती रोधक लावावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे



