Vidarbh24News

Latest Online Breaking News

झोप यावी म्हणून आई देते मुलांना पदराचा वारा…..

•कायर महावितरणच्या भोंगळ कारभार वारंवार चव्हाटयावर ,तरीही अधिकारी निद्रावस्थेत

कधी कधी रात्रभर राहावे लागते अंधारात…

•मेन्टेनसचा नावाखाली वर्षभर गावकऱ्यांना नाहक त्रास

वणी( 17.मे ) :– वणी तालुक्यांतील कायर गावात थोडाही वारा आला की हलका पाऊसही आल्यास विद्युत पुरवठा बंद होतो.दिवस-रात्र असा प्रकार सुरू असल्याने मोठ्या नागरिकांसह लहान मुलेसुद्धा पंख्याअभावी झोपत नाही. त्यामुळे मुलांच्या आईला रात्रीची झोपमोड करून लहान मुलांना मायेच्या पदराचा वारा घालावा लागतो.

कायर गावात नेहमीच वारंवार विद्युत पुरवठा बंद होत असल्याने परिसरातील नागरिक कंटाळले. कायर येथील महावितरणच्या कारभाराला कंटाळले असुन  देण्यात येते व या परिसरातील शेतकरी दिवसभर शेतात राबतात आणि त्यांना रात्र अंधारात काढावी लागते. त्यातच लहान मुले व वृद्धांना याचा खूप त्रास करावा लागतो. विद्युत पुरवठा त्वरित दुरुस्त करता येऊ शकतो, मात्र कायर गावातील काही लाईनमन पूर्णवेळ गावात राहत नाही  अशीही माहिती उघड़कीस आली आहे .

त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागते. याट्ट सुद्धा विद्युत कंपनीकडून नागरिकांना रिडिंगपेक्षा जास्त बिल येत असते.मात्र, मेंटेनेन्स भोंगड़ कारभारच्या नावखाली अद्यापही काम पूर्ण झाले नाही. याचा त्रास गावकऱ्यांना भोगावा लागते. सदर कायर गावाची कायमची दुरुस्ती करून विद्युत पुरवठा त्वरित प्रशासनाने दखल घेऊन घ्यावी व मुजोर लाइनमनला गावातुन त्वरित हकालपट्टी करावी जेणेकरुन गावातील समस्याकडे लक्ष देता येणार. या बाबत प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन कायर गावातील जनतेच्या विद्युतखंड बाबतिचा प्रश्न निकाली लागेल अशी जनतेकडून आर्त हाक दिसून येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!